स्क्रीनशॉट

वर्णन

तुमच्या कुकीजवर नियंत्रण ठेवा! टॅब बंद केल्यानंतर ठेवायच्या नसलेल्या कुकीज आपोआप हटवा. ज्या कुकीज ठेवायच्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही परवानगी यादी तयार करू शकता. मुख्य वैशिष्ट्ये - बंद केलेल्या टॅबचा साइट डेटा आपोआप हटवते - कायम ठेवण्याच्या यादीला/तात्पुरते ठेवण्याच्या यादीला समर्थन - तुमच्या कायम/तात्पुरते ठेवण्याच्या याद्या सहज निर्यात/आयात करा - एखाद्या डोमेनचा साइट डेटा साफ करा - पॉपअपमधून हाताने साफ करण्याच्या मोडला समर्थन वापर तुम्ही "Auto-clean" सक्षम करेपर्यंत हे विस्तारक आपोआप डेटा साफ करत नाही. यामुळे तुम्हाला साइट कायम ठेवण्याच्या यादीत जोडण्याची संधी मिळते. 1. ज्या साइटचा डेटा ठेवायचा आहे त्या कायम ठेवण्याच्या यादीत (कायमचा) किंवा तात्पुरते ठेवण्याच्या यादीत (ब्राउझर पुन्हा सुरू होईपर्यंत) जोडा 2. पॉपअपमध्ये "Auto-clean" किंवा सेटिंग्जमध्ये "Automatic cleaning" सुरू करा 3. वापरात नसलेला साइट डेटा नाहीसा होताना पाहा :) सेटिंग्जमधून साफसफाईच्या सूचना बंद करता येतात. टीप: साइट डेटामध्ये कुकीज, IndexedDB, Localstorage इत्यादींचा समावेश होतो. हा डेटा साफ करण्याची सुविधा ब्राउझरच्या API आणि विस्तारकाच्या अंमलबजावणीवर अवलंबून असते. तुम्हाला इतर कोणतीही समस्या आल्यास GitHub वर समस्येची नोंद करा. कदाचित आपण ती सोडवू शकू. Mozilla Firefox आणि Google Chrome यांच्या बदललेल्या आवृत्त्यांसाठी मदत उपलब्ध असेलच असे नाही, याची नोंद घ्या.