Norton Safe Web
ID
fnpbeacklnhmkkilekogeiekaglbmmkaतुम्ही वेब ब्राउझ करत असताना Norton Safe Web ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण देते.
स्क्रीनशॉट
वर्णन
तुम्ही वेब ब्राउझ करत असताना Norton Safe Web ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण देते.
तुम्ही ऑनलाइन शोध घेताना, खरेदी करताना किंवा ब्राउझ करताना Norton Safe Web धोकादायक साइटबद्दल इशारे देऊन तुमच्या ओळखीच्या चोरीपासून आणि ऑनलाइन फसवणुकीपासून तुमचा बचाव करण्यात मदत करते.
Norton Safe Web तुम्ही लोड केलेल्या प्रत्येक पानाच्या सुरक्षिततेची माहिती मिळवण्यासाठी Norton च्या Remote URL Reputation Service कडे विचारणा करते. ही सेवा धोक्यांबद्दलच्या अद्ययावत माहितीसह ठरावीक कालांतराने अद्ययावत केली जाते. तुम्हाला सुरक्षित ऑनलाइन अनुभव देण्यासाठी Norton Safe Web दुर्भावनायुक्त पाने आणि डाउनलोड आपोआप ब्लॉक करते.
---
हे एक्स्टेंशन त्यातील आवश्यक कार्ये करण्यासाठी अशा परवानग्या वापरते, ज्यांमुळे Chrome मध्ये पुढील संदेश दिसतात.
“तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटवरील तुमचा सर्व डेटा वाचणे आणि बदलणे”
तुम्ही ब्राउझ करत असलेल्या सर्व प्रकारच्या पानांवर ऑनलाइन धोके शोधण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी हा संदेश दाखवला जातो.
“तुमचा ब्राउझिंग इतिहास वाचणे”
पुढील गोष्टींसाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी हा संदेश दाखवला जातो:
- धोकादायक आशय आढळल्यावर ब्लॉक केल्याचे सांगणारे पान दाखवणे.
- Chrome किंवा वापरकर्त्याने टॅबमध्ये बदल करताना साइटच्या सुरक्षिततेच्या मूल्यमापनाची माहिती विश्वासार्हपणे दाखवणे.
“तुमचे डाउनलोड व्यवस्थापित करणे”
दुर्भावनायुक्त डाउनलोड काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीसाठी हा संदेश दाखवला जातो.
“सूचना दाखवणे”
संरक्षणाशी संबंधित कार्यात महत्त्वाचे बदल झाल्यावर किंवा काही वैशिष्ट्यांसाठी ओळख पडताळणे आवश्यक असल्यावर इशारे दाखवण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी हा संदेश दाखवला जातो.
“नवीन पार्श्वभूमी ॲप जोडले गेले
सिस्टम सुरू झाल्यावर Norton Safe Web सुरू होईल आणि तुम्ही इतर सर्व Google Chrome विंडो बंद केल्यानंतरही पार्श्वभूमीत चालू राहील.”
सुरू होण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याकरिता एक्स्टेंशन चालू ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परवानगीसाठी हा संदेश दाखवला जातो.
हे एक्स्टेंशन त्यातील काही कार्ये करण्यासाठी Chrome मध्ये न दाखवल्या जाणाऱ्या परवानग्याही वापरते:
“webRequest” आणि “webRequestBlocking” परवानग्या
पुढील गोष्टींसाठी आवश्यक:
- काही धोके ब्लॉक करण्यात मदत करण्यासाठी वेबसाइट ब्राउझ करताना तांत्रिक स्तरावरील डेटामध्ये प्रवेश करणे.
- काही वैशिष्ट्यांसाठी ओळख पडताळणे.
“storage” परवानगी
एक्स्टेंशन वापरत असलेल्या सेटिंग्जचा डेटा साठवण्यासाठी आणि पुन्हा मिळवण्यासाठी वापरली जाते.
---
---
हे ॲड-ऑन वापरून तुम्ही आमच्या परवाना आणि सेवा कराराला (https://www.nortonlifelock.com/content/dam/nortonlifelock/pdfs/eulas/licensing-agreement/customer-agreement-en.pdf) सहमती देता आणि आमचे जागतिक गोपनीयता निवेदन (https://www.nortonlifelock.com/us/en/privacy/global-privacy-statement/) वाचले असल्याचे आणि त्याची दखल घेतल्याचे मान्य करता.
हे ॲड-ऑन गंभीर त्रुटी आणि वैशिष्ट्यांच्या वापराबद्दलची माहिती Google Analytics सेवांकडे पाठवण्यासाठी Google Analytics च्या Measurement Protocol चा वापर करते. हे ॲड-ऑन सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी NortonLifeLock Google Analytics सेवा वापरते, परंतु या सेवा NortonLifeLock चालवत नाही.
हे डेटा संकलन आणि त्याचा वापर यांना तुमची संमती नसल्यास, कृपया हे ॲड-ऑन इंस्टॉल करू नका किंवा ते आधीच इंस्टॉल केलेले असल्यास काढून टाका.
Google Analytics मधील प्रक्रियेदरम्यान तुमचा IP पत्ता अस्पष्ट करण्यासाठी Google पुरवत असलेले पॅरामीटर हे ॲड-ऑन सेट करते. Google Analytics वापरण्याबाबत आमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, Google च्या गोपनीयतेसंबंधी पद्धती आणि IP पत्ता अस्पष्ट करण्यासाठी Google कडून दिले जाणारे समर्थन याबद्दल अधिक तपशील येथे पहा:
- https://developers.google.com/analytics/policy
- https://support.google.com/analytics/answer/6004245
- https://support.google.com/analytics/answer/2763052
स्वामित्व हक्क © 2021 NortonLifeLock Inc. सर्व हक्क राखीव. NortonLifeLock, NortonLifeLock लोगो, Checkmark लोगो, Norton, LifeLock आणि LockMan लोगो हे युनायटेड स्टेट्स आणि इतर देशांमध्ये NortonLifeLock Inc. किंवा तिच्या संलग्न कंपन्यांचे ट्रेडमार्क किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत. Google Chrome हा Google, LLC चा ट्रेडमार्क आहे. इतर नावे त्यांच्या संबंधित मालकांचे ट्रेडमार्क असू शकतात.