वर्णन

LEGO® Education WeDo 2.0 ॲप विद्यार्थ्यांना उत्कृष्ट विज्ञान प्रकल्पांचा अभ्यास करण्याची संधी देते. फक्त Chromebook शी सुसंगत! WeDo 2.0 मुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी प्रत्यक्ष कोडिंग करू शकतात. LEGO® विटा, वापरण्यास सोपे सॉफ्टवेअर आणि लक्ष वेधून घेणारे STEM प्रकल्प यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंगची सोपी कौशल्ये शिकवण्यासाठी शिक्षकांना आवश्यक असलेले सर्व काही मिळते. LEGO® विटांनी मॉडेल तयार करणे आणि नंतर वापरण्यास सोप्या वर्गातील ॲपने WeDo 2.0 ला जिवंत करणे, या अनोख्या संयोजनात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या वर्गांसाठी रंजक पाठयोजना आहेत. त्यामुळे तुमच्या वर्गात प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही तुम्हाला मिळते. अभिप्राय “WeDo 2.0 मध्ये असे प्रकल्प आहेत ज्यांत विद्यार्थी रोव्हरच्या मॉडेलने मंगळाच्या पृष्ठभागाचा शोध घेऊ शकतात किंवा बेडकाच्या रूपांतरणातून ॲमेझॉनच्या वर्षावनाचा अभ्यास करू शकतात.” - JEFFREY MARLOW, Harvard University मधील भूजीवशास्त्रज्ञ आणि The Mars Academy Education and Development Program चे संस्थापक “LEGO हे जगातील सर्वांत लोकप्रिय खेळणे असण्यामागे कारण आहे. ते मुलांच्या कल्पनाशक्तीला प्रेरणा देते आणि ती वाढवतेच, शिवाय एक मोलाचे शैक्षणिक साधन म्हणूनही वापरता येते, हे कंपनीच्या नवीन WeDo 2.0 रोबोटिक्स आणि कोडिंग किट्सवरून दिसते.” – GIZMODO “विद्यार्थ्यांना शिकण्यात गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांना महाविद्यालय व करिअरसाठी तयार करण्यासाठी LEGO® Education ची साधने खरोखर उपयुक्त आहेत; हेच आमचे अंतिम ध्येय आहे.” - FREDERICK TUDDA, मुख्याध्यापक, P.S. 188, न्यूयॉर्क पुरस्कार स्वतः वस्तू तयार करणाऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान: LEGO® Education WeDo 2.0 “LEGO® Education WeDo 2.0 हे प्राथमिक शाळेतील मुलांना प्रोग्रामिंगच्या जगाची ओळख करून देणारे शैक्षणिक रोबोटिक्स किट आहे. एक गोंडस रोबोट आणि सोबतच्या ॲपमुळे इयत्ता 2 री ते 4 थीतील विद्यार्थ्यांना कोड कसा तयार होतो हे समजू शकते. हे उत्पादन शिक्षकांसाठीही तयार केले आहे; ते सोबतचा अभ्यासक्रम वापरून विज्ञानाची मूलतत्त्वे शिकवू शकतात. शैक्षणिक साधनसंच म्हणून नावीन्यपूर्ण असल्यामुळेच नव्हे, तर परवडणाऱ्या किमतीमुळेही या उत्पादनाने हा पुरस्कार जिंकला.” – MONA LALWANI, वरिष्ठ संपादक, ___________ • CEEIA (China Educational Equipment Industry Association) कडून 2017 Golden Product Award • Parent Award 2016 • Best of CES 2016 • Gotta Be Mobile Excellence Award 2016 • Worlddidac Award 2016 • New York Design Awards • TOMMI German Children Software Award WeDo 2.0 शालेय ॲप आणि LEGO® विटांचा संच वापरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता: - प्रश्न विचारणे आणि समस्या सोडवणे, मॉडेल बनवणे, प्रारूप तयार करणे, तपास करणे, माहितीचे विश्लेषण व अर्थ लावणे, संगणकीय विचार करणे, पुराव्यावर आधारित युक्तिवाद तयार करणे आणि माहिती मिळवणे, तिचे मूल्यमापन करणे व ती इतरांना सांगणे अशा विज्ञान आणि अभियांत्रिकीतील 8 कार्यपद्धतींबद्दल विद्यार्थ्यांची समज बळकट करा. - भौतिक विज्ञान, जीव विज्ञान, पृथ्वी व अंतराळ विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा वापर अशा प्रमुख विज्ञान विषयांवरील प्रत्यक्ष कृतींच्या पाठयोजनांतून क्षमता विकसित करा. - तुमच्या विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची, चिकित्सक विचार करण्याची, संवाद साधण्याची आणि सहकार्य करण्याची कौशल्ये सुधारा. - संगणकीय विचारक्षमता वाढवण्यासाठी संबंधित शैक्षणिक ॲप्सचा वापर समाविष्ट करा. - प्रत्यक्ष कृतींसाठीचे हे वर्गातील ॲप विद्यार्थ्यांच्या संगणक प्रोग्रामिंगचा शोध घेण्याच्या आणि ते समजून घेण्याच्या नैसर्गिक इच्छेला चालना देते, आणि शिकण्याचा हा खरोखर सर्वोत्तम मार्ग आहे. - Next Generation Science Standards वर आधारित 40 तासांहून अधिक पाठयोजनांचा समावेश असलेल्या, आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम शैक्षणिक ॲपने मुलांना कोडिंग शिकवा. *** महत्त्वाचे*** हे स्वतंत्रपणे वापरण्यासाठीचे शैक्षणिक ॲप नाही. स्वतंत्रपणे विकल्या जाणाऱ्या LEGO® Education WeDo 2.0 विटांच्या संचाचे प्रोग्रामिंग करण्यासाठी हे ॲप वापरले जाते. अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक LEGO Education विक्रेत्याशी संपर्क साधा. सुरुवात करा: www.legoeducation.com/start पाठयोजना: www.legoeducation.com/lessons मदत: www.lego.com/service Twitter: www.twitter.com/lego_education Facebook: www.facebook.com/LEGOeducationNorthAmerica Instagram: www.instagram.com/legoeducation LEGO आणि LEGO लोगो हे LEGO Group चे ट्रेडमार्क आणि/किंवा कॉपीराइट असलेली सामग्री आहेत. ©2017 The LEGO Group. सर्व हक्क राखीव.